वाद्यांची ओळख – क्रमांक २ (पेटी – Harmonium)

कलेतला आनंद

दिनांक: ११ मार्च, २०१६

भारती निवास सोसायटी च्या बालरंजन केंद्रातील मुलांनी ” वाद्यांची ओळख” कार्यक्रमात पेटी ( हार्मोनियम ) या वाद्याची ओळख करून घेतली . बालरंजन च्या माजी पालक सौ . आरती कान्हेरे यांनी सोप्या भाषेत मुलांना आरोह- अवरोह सांगून त्यांच्याकडून सरगम गाऊन घेतली .तसेच भूप व कल्याण राग शिकवून त्यावरील असावा सुदर चोकलेट चा बंगला सारखी बालगीते म्हणून घेतली . पेटी चा भाता दाबल्यावर हवा आतमध्ये जाते व बटणे दाबल्यावर स्वर निर्माण होतात असे त्यांनी सांगितले .  

“कलेमुळे जीवनात आनंद निर्माण होतो तसेच एकाग्रता वाढते त्यामुळे कलेचे मुलांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असल्याचे “सन्चालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या.

आशा होनवाड यांनी आभार मानले .पेटी वरील राष्ट्रगीताला सर्वांनी ते गाऊन साथ दिली आणि कार्यक्रमाचा समारोप केला .

पेटीवादन-सादर-करताना-सौ.-आरती-कान्हेरे

पेटीवादन-सादर-करताना-सौ.-आरती-कान्हेरे

पेटी-वादनाचा-आनंद-लुटताना-बालरंजन-केंद्रातील-बालचमू

पेटी-वादनाचा-आनंद-लुटताना-बालरंजन-केंद्रातील-बालचमू